अलंगुण l प्रतिनिधी- दि.19 रोजी सायंकाळी तोरणडोंगरी ता. सुरगाणा जि. नाशिक या अतिदुर्ग भाग समजल्या जाणाऱ्या आदिवासी छोट्याशा गावी तोरणाई गाव विकास समिती, तोरणडोंगरी तर्फे नागरी सत्कार सोहळा, व गावातील कला ,किडा, सांस्कृतिक व विविध स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी , इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गावातील गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ मा.आमदार सौ. मंजुळाताई तुळशीराम गावित, साक्री विधानसभा ,मा. डॉ. तुळशीराम बुद्धाजी गावित जिल्हा शिवसेना प्रमुख, मा. कॉ. जे. पी. गावित, माजी आमदार सुरगाणा, मा.श्री.एन.डी.गावित सुरगाणा पंचायत समिती सदस्य, मा.श्री.इंद्रजीत गावित सभापती, सुरगाणा पंचायत समिती श्री. अशोक बागुल अध्यक्ष केंद्रीय आदिवासी बचाव अभियान, श्री.राम चौरे कोकणा माजी अध्यक्ष, कोकणी संघटना श्री.जयवंत गारे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच मा.आमदार सौ. मंजुळाताई तुळशीराम गावित, मा.डॉ. तुळशीरामजी गावित, प्यारा ओलंपिक पटू श्री.दिलीप गावित यांचे आई-वडील यांचा गावाच्या वतीने व नातेवाईकांच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या उज्वल यशासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमाचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमाचे मुख्य आयोजक श्री.जयराम मोहन गावित , प्रक्षेत्र व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे कार्यरत आहेत. त्यांनी नेहमीच गावाच्या विकासाबद्दलची तळमळीतून या उपक्रमाची संकल्पना उदयास आली. सन 2009 ते आज पर्यंत प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो.आजची मुले ही उद्याची भावी पिढीचे शिल्पकार आहेत. तेच देश घडविणार आहेत. मुलांमध्ये असलेल्या उपजत गुण,कौशल्य आहेत त्यांना त्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा.ती मुले सदैव खडतर परिश्रम व मेहनत करून यशाचे उतुंग शिखर गाठतील व जीवनातील अंतिम स्वप्न साकारून सुजाण नागरिक बनावे ,चांगले शिक्षण घेऊन नोकरी अथवा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहावे व भविष्यामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे होतील त्यांनी समाजाला मदत करावी हाच या संकल्पने मागील उद्देश आहे. असे श्री. जयराम गावित यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून सांगितले या कार्यक्रमा प्रसंगी सौ.मंजुळाताई गावित आमदार ,साक्री विधानसभा, मा.डॉ.तुळशीराम गावित, धुळे जिल्हा शिवसेनाप्रमुख, मा.कॉ. जे. पी. गावित श्री. इंद्रजीत गावित श्री. अशोक बागुल ,श्री. राम चौरे कळवण ,श्री.धर्मेंद्र पगारिया सुरगाणा ,श्री. पांडुरंग भोये अलंगून ,श्री.वाडेकर सर श्री. दिगंबर चौधरी, श्री.सुकरजी ठाकरे मुख्याध्यापक, श्री.रहीराव पवार आदी मान्यवरांचा तोरणाई गाव विकास समितीतर्फे जल्लोषात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्यारा ओलंपिक धावपटू व नुकताच जाहीर झालेला सन 2023- 24 सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेला तोरणडोंगरीचा सुपुत्र श्री.दिलीप गावित यांच्या आई वडिलांचाही येतोचित गौरव करून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी श्री.राम चौरे, श्री. एन.डी. गावित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की यासारख्या उपक्रमामुळे आजच्या पिढीसाठी खरोखरच प्रेरणादायक आहे. पेरणादायी बक्षीस दाखवल्याशिवाय त्याच्या कला गुण व कौशल्यांना चालना मिळत नाही. मुलांमध्ये उपलब्ध असलेल्या सूक्त गुण असतात ते विकसित करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. शहरातील विद्यार्थी जादा शिकवणी वर्गाचा फायदा घेऊन गुणवत्ता यादीत येतात आदिवासी मुली ही गरीब असून स्वबळावर परिश्रम व मेहनत घेऊन यशाचे मानकरी ठरतात म्हणून त्यांचा वेळच्यावेळी गौरव होणे उचित आहे असे मा.डॉ. तुळशीराम गावित शिवसेनाप्रमुख धुळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. तसेच या भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देण्याचे सामर्थ्य आपल्या विद्यार्थ्यांना मध्ये आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. त्यांना स्थानिक परिस्थितीची पूर्ण जाणीव व्हावी.याकरिता त्यांनी स्वतःचे बालपण ते डॉ.पद, आणि आतापर्यंत कार्यरत असलेले अनेक पदापर्यंत पोहोचण्यासाठी किती यातना भोगावे लागल्या इत्यादींची कहाणी सांगितली. आजच्या परिस्थितीशी सामना करणे सोपे झाले आहे. कारण मदतीसाठी भरपूर हात पुढे सरसावतात,आपण फक्त घेणारे पाहिजे व त्याचा सदुपयोग केला पाहिजे येथील विशेष प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. मा.सौ.मंजुळाताई गावित आमदार साक्री,यांनी आपल्या नागरी सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की तोरणडोंगरी गावाच्या वतीने व नातेवाईकांच्या वतीने झालेला जाहीर सत्कार आम्ही मनपूर्वक स्वीकार करतो. जि.प.शाळा तोरणडोंगरीने चांगले काम केल्यामुळे शिक्षकांची विशेष स्तुती केली. आदिवासी भागातील मुलांमध्ये खरोखरच उपजत गुण आहेत या गावातील कला, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी अग्रेसर आहेत कारण तोरणडोंगरी गावच पारंपारिक आदिवासी कलेमध्ये पारंगत आहेत आपल्या कलेचे व संस्कृतीचे जतन आजही येथे पाहावयाला मिळले.स्वागतास सज्ज असणाऱ्या भव्य कला पथकांचेहि गोड कौतुक केले.माझा विधानसभा मतदार संघा मतदार संघ जरी नसला तरीपण शाळेसाठी काही अडचण असेल तर मदतीची हाक दया आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद तोरणडोंगरी या शाळेची यशोगाथा सांगताना शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. पंडित गायबन यांनी शाळा स्थापन झाल्यापासून ची स्थिती ते आजची प्रगतशील शाळा याचे कथन केले. याच शाळेतून श्री.दिलीप गावित प्यारा ओलंपिक धावपटू, श्री.जगन फौजदार खोखो क्रीडापटू असे राज्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत येथील पाच वर्षांमध्ये २१ विद्यार्थ्यांची नामांकित शाळेत निवड झालेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सन 2023 मध्ये द्वितीय तर सन 2023 -24 मध्ये सुरगाणा तालुक्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे .अखेर काँ. जे.पी. गावित माजी आमदार, कळवण सुरगाणा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन व संयोजकांचे अभिनंदन केले. आजची मुले ही भावी पिढीचे शिल्पकार आहेत आज शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्राची जाणीव करून दिली. चांगले शिक्षण घेतले तरच सुरगाणा सुजाण नागरिक बनून अन्यायविरुद्ध संघर्ष करता येईल. अखेर या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यक्रमासाठी व यशाच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावाचे पोलीस पाटील श्री. कैलास भुसारे श्री. आनंदा गावित, माजी सरपंच श्री. देविदास जाधव,उपसरपंच श्री .रघुनाथ भुसारे मा सरपंच श्री.अशोक भुसार श्री.लहानु भोये, श्री.संतोष भुसारे श्री. महारु जाधव, श्री गंगाराम म्हसे, डॉ.रमण गावित. श्री.परसराम गावित श्री.वसंत गावित ग्रामपंचायत सदस्य ,महिला बचत गट प्रतिनिधी, गावातील तरुण युवक, ज्येष्ठ व्यक्ती ,सर्व महिला, सर्व कलापथक, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिगंबर चौधरी, श्री.पंडित गायवन श्री. पुंडलिक चौधरी ,श्री .रामदास भोये श्री. मनोहर भोये ,श्री.गणेश पाडवी, श्री.श्रीकांत गवळी, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश पाडवी सर यांनी केले तर उपस्थितांचे मनःपूर्वक आभार श्री रामदास भोये सर यांनी मधुर वाणीतून आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
Tags
सामाजिक