पेठ - ग्रामीण व अतिदुर्गम भागातील आरोग्य शिक्षण पाणी व रोजगार या प्रमूख नागरी गरजांवर काम करणाऱ्या सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील आडगाव (भू) येथे एसएनएफ 33 व्या जलप्रकल्पाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
प्रारंभी गावाच्या वेशीवरून पारंपारिक नृत्याच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. मनपाचे निवृत्त आयुक्त जीवन सोनवणे , ॲस्ट्रल फाऊंडेशन चे अनिकेत धूरी यांनी शेकडो महिलांच्या उपस्थितीत लोकार्पण केले.
या लोकार्पणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ३३ व्या दुर्गम गावात एसएनएफ ने पाण्याची कायमस्वरूपी सोय केली. त्यातून आतापर्यंत 50 हजारा हून अधिक नागरिकांच्या आयुष्यातून पाण्याच्या टंचाईचे संकट दूर झाले असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी प्रास्तविकात सांगितले. समन्वयक रामदास शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.
याप्रसंगी जीवन दादा सोनवणे , अनिकेत धूरी , सरपंच रेखा नेताजी गावित , एसएनएफ चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड , प्रशांत बच्छाव , विजय भरसट , रामदास शिंदे , जयदिप गायकवाड , राहूल गाडगीळ , व्यवस्थापक संदिप डगळे , ग्रामपंचायत सदस्य प्रमिला भांगरे , पोलीस पाटील रामदास गवे , रामा जाधव , शिवराम गवे ,तुकाराम वाघमारे ,तुकाराम बागुल , हरी खुरकुटे , योगीराज भांगरे , सामाजिक कार्यकर्ते नेताजी गावित , मुख्याध्यापक श्रीमती चौधरी , बाळू खैरनार , भाऊराव खिल्लारे , श्रीराम अष्टेकर यांचे सह सर्व ग्रामस्थ महिला मंडळ विद्यार्थी उपस्थित होते.
ॲस्ट्रल फाऊंडेशन ने जपली सामाजिकता !
सोशल नेटवर्किंग फोरमच्या सामाजिक कार्यात ॲस्ट्रल फाऊंडेशनने सतत योगदान देऊन सामाजिकता जपली असून पेठ त्र्यंबकेश्वर सुरगाणा सारख्या अतिदुर्गम भागतील गावांना पिण्याचे पाणी व अभ्यासिका सुरू करण्यासाठी सातत्याने आर्थिक मदत पुरवल्याने हजारो महिला व तरुणांच्या आयुष्यात आनंद पेरल्याचे दिसून येते.
खुरकुटे दाम्पत्यांनी दिली मोफत जागा
आडगाव ( भू) येथे गावाच्या शेजारीच शेती असलेल्या हरिभाऊ व गोदाबाई खुरकुटे या दाम्पत्याने पाण्याची टाकी बांधण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्याबरोबर पाण्याच्या टाकीचे संरक्षण व देखभालीची जबाबदारी घेतल्याने या परिवाराने सामाजिक कार्यात आदर्श निर्माण केला आहे. मान्यवरांच्या हस्ते या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला.
आडगाव (भू) ता. पेठ येथे एसएनएफ च्या जलप्रकल्पाचे लोकार्पण प्रसंगी उपस्थित अनिकेत धूरी , जीवन सोनवणे , प्रमोद गायकवाड , सरपंच रेखा गावीत , प्रशांत बच्छाव आदी.