दिंडोरी । प्रतिनिधी -भरधाव वेगातील स्वीप्ट कारने दुचाकीवरुन जाणार्या वृद्धास धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. विश्वनाथ शंकर कावळे (रा. बोपेगाव, ता. दिंडोरी) हे (एमएच 15 एफएक्स 9939) या क्रमांकाच्या दुचाकीवरुन बोपेगावकडे जात असताना (एमएच 15 एचसी 4116) क्रमांकाची कार भरधाव वेगात आली. कारने दुचाकीला धडक दिल्याने विश्वनाथ कावळे हे गंभीर जखामी झाले व दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. विजय कावळे यांचे फिर्यादीवरुन रवींद्र कावळे (रा. बोपेगाव) याच्यावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.