वणी। प्रतिनिधी :-
सप्तशृंग गडावर दर्शनासाठी गेलेल्या नाशिकच्या सातपूर येथील भाविकाचा मृत्यू झाला आहे. बाळू दत्त गिरी गोसावी रा. महालक्ष्मी चौक, प्रबुद्ध नगर, एमआयडीसी, सातपूर, नाशिक हे गडवर दर्शनासाठी गेले होते. अचानक त्यांच्या छातीत दुखण्यास प्रारंभ झाला व रक्ताच्या उलट्या झाल्या व श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान डॉ. करण वर्मा यांनी गोसावी यांना मयत घोषित केले. याप्रक्वणी आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.