महाराष्ट्र ट्रायबल न्युज

लोकनियुक्त सरपंच अनिता राजेंद्र पवार यांना दैनिक लोकमचा "तेजस्विनी पुरस्कार - २०२५" प्रदान

नामदेव पाडवी / बाऱ्हे वार्ताहर 
       सुरगाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या पत्नी लोकनियुक्त सरपंच अनिता राजेंद्र पवार यांना मानाचा समजला जाणारा दैनिक लोकमचा तेजस्विनी पुरस्कार - २०२५ प्रदान करण्यात आला. तेजस्विनी पुरस्कार - २०२५ सोहळा नाशिकच्या रॉयल हॉल, एक्स्प्रेस इन, येथे पार पडला. 
       पोलीस आयुक्त मोनिका राऊत, प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, डॉ. सुधीर नेवसे (भा.प्र.से) यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. समाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      सदैव समाज कार्यासाठी तत्पर असणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत रोकडपाडा येथील लोकनियुक्त सरपंच अनिता पवार आरोग्य विभागातील जिल्हा रुग्णालय नाशिक व प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव येथील अधिपरिचारीकेची नोकरी सोडून कळवण - सुरगाणा मतदार संघातील विद्यमान आमदार नितीन अर्जुन (एटी) पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार याच्या मार्गदर्शनाखाली २०२२ साली त्या ग्रामपंचायतीवर थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्या. प्रशासनाचा असणारा त्यांचा दांडगा अभ्यास व अहोरात्र कष्ट करण्याची आधीपासूनच सवय असणाऱ्या ग्रामपंचायतमधील प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली. सभामंडप, स्मशानभूमी, ग्रा.पं.कार्यालय, अंगणवाडी इमारत, दोन गावांना जोडणारे रस्ते, पूल, गाव अंतर्गत रस्ते, जल संवर्धनासाठी लघुपाट बंधारे, मृदा. संवर्धनासाठी सपाटीकरण, वृक्ष लागवड, सांडपाणी व्यवस्थापन, रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारे लाभ, घरकुल योजना, स्वछ कारभार, निस्वार्थी पणे लोकांची सेवा करणे इत्यादी कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत एक नवीन आदर्श घालून दिला आहे. त्याच कार्याची दखल घेऊन दैनिक लोकमत समूहाच्या वतीने तेजस्विनी पुरस्कार - २०२५ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने