मोहाडी l प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई यांच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रिकल्चर कार्यक्रमांतर्गत शिबिराचे मोहाडी येथे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. सप्ताहभरातील या शिबिरांतर्गत ५८ विद्यार्थ्यांनी देवराईमध्ये एक दिवस दोन तास विशेष श्रमदान केले.
त्यामध्ये दगडांची मांडणी,अस्तरीकरण तसेच देवराई मध्ये ५ फूट रुंदीचा १०० मीटर दगड,मुरमाचा रस्ता करण्याचे काम केले. हे श्रमदान करत असतानाच शिक्षक व विद्यार्थ्यांनी
देवराईमधील झाडांची देवराई सदस्यांकडून माहिती घेतली.
पर्यावरणाच्या या कार्यात सहभाग म्हणून यापुढील काळातही विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड व संवर्धन प्रचार व प्रसार करूण पर्यावरण जनजागृती करू असा बोध सदर श्रमसंस्कार शिबिरातुन घेत निसर्गाच्या सान्निध्यात आनंद व्यक्त केला.
श्रमसंस्कार शिबिर यशस्वीतेसाठी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अधिकारी व देवराई सदस्य यांनी परिश्रम घेतले.
मोहाडी: श्रमदान प्रसंगी विद्यार्थी व देवराई सदस्य.