महाराष्ट्र ट्रायबल न्युज

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घंटागाडीचे लोकार्पण


म्हेळुस्के l प्रतिनिधी:- वाढत्या रोगराईच्या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर स्वच्छता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा म्हेळुस्के ग्रामपंचायत उपसरपंच योगेश बर्डे यांनी केले ते घंटागाडी लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
15 व्या वित्त आयोगातून म्हेळुस्के ता.दिंडोरी ग्रामपंचायतीने तीन चाकी इ- घंटागाडी खरेदी करून तिचे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व नागरिक यांच्या शुभ हस्ते विधीवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
         स्वच्छते विषयी अधिक माहिती देताना योगेश बर्डे म्हणाले, गावातील व गावाच्या सभोवताली इतरत्र अस्ताव्यस्त पडणारा ओला व सुका कचरा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व गावाच्या दृष्टीने प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेऊन गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पर्याय म्हणून कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीची आवश्यकता असल्याने घंटागाडी खरेदी करून याचे आज ग्रामपंचायतीने लोकार्पण केले आहे.
          या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत विविध उपक्रम राबवले जात असतांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ग्रामपंचायतचे आद्य कर्तव्य असून गावातील तसेच गावाच्या सभोवताली असणारा ओला व सुखा कचरा उचलण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या घंटागाडीचा वापर करण्यात येईल. तरी महिला,पुरुष व व्यावसायिक निश्‍चितच या उपक्रमास प्रतिसाद देऊन ग्रामपंचायतला सहकार्य करतील अशी अपेक्षा योगेश बर्डे यांनी व्यक्त केली.
  घंटागाडी लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावातील प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरातील ओला व सुखा कचऱ्याचे वर्गीकरण करून तो कचरा घंटागाडीत जमा करण्यासाठी प्रत्येकी दोन डस्टबीन(कचराकुंडी)वाटप करण्यात आल्या आहे.
 "स्वच्छ भारत"अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची कुणाकडूनही पायमल्ली होणार नाही याची काळजी घ्यावी,अन्यथा यासंदर्भात गावातील कोणत्याही नागरिकाने बेशिस्तपणे कुठेही कचरा टाकला असे निदर्शनास आल्यास संबंधितास ५००रु.याप्रमाणे दंड आकारला जाईल असे ग्रामसेवक धिरज भामरे यांनी सांगितले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम पगार यांनी केले. घंटागाडी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक,महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने