पेठ । प्रतिनिधी:-शासनाने निर्धारीत कालावधीत सर्व सामान्य नागरीकांना अल्प कालावधीत कार्यालयीन सेवा देणेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी सेवा हक्क दिन पेठ तालुक्यातील जवळपास सर्व विभागातील अधिकार्यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी तहसिलदार आशा गांगुर्डे यांनी या कायद्याचे वैशिष्ठ व त्याचा वापर करुन आपली समस्या सोडवून घेण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका भूमी अभिलेखच्या उपअधिक्षीका नंदा बहीरट, नायब तहसिलदार रामकिसन राठोड, संगायोचे अनिल उपरे, पुरवठा निरीक्षक वनिता गायकवाड आदी उपस्थित होते . यावेळी सन 2024 - 25 मध्ये व्हीएलई -6 वर उत्कृष्ठ काम केलेल्या यासीन शेख, संपत दळवी, नितीन धर्मराज महाले, भगवान गायकवाड , विनोद सहाळे, रविंद्र महाले, प्रशांत टोपले यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उत्पन्नाचे 15, जातीचे 7, अधिवास 12, ई रेशनकार्ड 10 दाखल्यांचे वितरण करण्यात आले.