बोरगाव l प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यात सेवा हक्क दिन सोमवारी (दि. २८) नूतन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी तहसीलदार मोहन कुलकर्णी होते.
कार्यक्रमास विविध सरकारी कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक व सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात नायब तहसीलदार सुयोग वाघमारे यांच्या प्रार्थनेने झाली. निवासी तहसीलदार मोहन कुलकर्णी यांनी सर्वांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली.
कार्यक्रमात नागरिकांना मिळणाऱ्या सरकारी सेवा, त्यासाठी लागणारी अर्ज प्रक्रिया व ऑनलाइन सेवा याबाबत सविस्तर माहिती दिली. भूमी अभिलेख विभागाने दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती पत्रके वाटण्यात आली. महसूल विभागाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगण्यात आली