maharashtratribalnews

आंबोडे येथे ५९ लाभार्थ्यांना बा-हे वनविभागाकडून गॅसचे वितरण

बा-हे l नामदेव पाडवी- (ता.०२)
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील ५९ लाभार्थ्यांना बा-हे वनविभागाकडून गॅसचे वितरण वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पं.स.सदस्य एन डी गावीत, सुरगाणा मंडल अध्यक्ष विठ्ठल गावीत, उंबरठाण - बा-हे मंडल अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच राजेंद्र निकुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
       यावेळी वनपाल माया म्हस्के, प्रवीण गांगुर्डे, हिरामण महाले, वनरक्षक सुशिला लोहार, नम्रता थैल, बेबी महाले, जयश्री चौधरी, प्रमिला गावीत, काळु वालदे, हेमंत गावीत, अलका भोये, ग्रामपंचायत सदस्य द्रोपदा घांगळे, सुरेश घांगळे, कैलास वाघेरे, धर्मराज ठाकरे, वसंत घांगळे, हंसराज जाधव यांच्यासह गावातील तरुण वर्ग व माता-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने