maharashtratribalnews

एसएमबीटी हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन

सुरगाणा l कृष्णा पवार:- एसएमबीटी हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 18 जून 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा येथे भरविण्यात येणार आहे.
     या शिबिरात विविध विभागातील तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे. खालील आजारांवर तपासणी आणि उपचार उपलब्ध असतील:
हृदयरोग: छातीत दुखणे, दम लागणे, घाम येणे, डाव्या हातात मुंग्या/वेदना – मोफत ईसीजीची सुविधा उपलब्ध
मेडिसिन: उच्च रक्तदाब, मधुमेह, चक्कर येणे, डोकेदुखी
सर्जरी: हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, मूळव्याध, पित्ताशयातील खडे आदी शस्त्रक्रिया
स्त्रीरोग: पाळीचे त्रास, गर्भाशय व अंडाशयाच्या गाठी
कान-नाक-घसा: थायरॉईड, कान पडदा, नाकातील अडथळा
नेत्ररोग: मोतीबिंदू, तिरळेपणा, कमी दृष्टी
अस्थिरोग: गुडघेदुखी, खांदेदुखी, दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया
बालरोग: जन्मजात दोष, दुभंगलेले टाळू व ओठ
शिबिरातील विशेष सेवा:
शुगर, रक्तदाब, ब्लड ऑक्सिजन तपासणी, ईसीजी, व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला जाईल.

सर्व रेशनकार्ड धारक रुग्णांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.
(महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत)

शिबिराचे ठिकाण: ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा, ता. सुरगाणा, जि. नाशिक
नाव नोंदणीसाठी संपर्क: 7720053255 / 7720053256
      जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने