सुरगाणा l केशव धुम:- ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस जिल्हा परिषद आदर्श शाळा करवंदे येथे उत्साहात साजरा करणेत आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपारीक वेश परिधान करून लेझिम पथकाद्वारे आदिवासी नृत्य, गाणी म्हणून आपल्या आदिवासी समाजाचे दर्शन घडविले. गावातुन प्रभातफेरी काढतांना गावातील नागरीकांनी आपल्या विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक केले. यात लेझिम पथकाने उपस्थिताचे डोळाचे पारणे फेडले. प्रभातफेरी नंतर भगवान बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले. जागतिक आदिवासी दिनाचे महत्व सांगण्यात आले. तसेच क्रांतीदिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्यावर ताल धरला, अशा प्रकारे आदिवासी दिन साजरा करणेत आला.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुणवर्ग, विशेतः महिलावर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमासाठी धुमसर.राऊतसर, गायकवाडसर, श्रीम. अहिरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आदर्श शिक्षक श्री. विनायक भोये यांनी केले या प्रसंगी नागरिकांनी कार्यक्रमासाठी उत्फुर्त सहभाग दिल्याने सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुख्याध्यापक श्री. चव्हाणसर यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले, व सहभागी शिक्षकाचे आभार मानले.