सुरगाणा l प्रतिनिधी: सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात आज सकाळी एक पिकअप गाडी दरीत कोसळल्याची घटना घडली. ही गाडी अंदाजे 150 ते 200 फूट खोल दरीत गेली असून सुदैवाने वाहनात कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. सध्या वाहन कुठल्या भागातील आहे हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने मदतकार्य सुरू केले. वाहन रिकामे असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत.