बोरगाव l लक्ष्मण बागुल :- दि. 16 ऑक्टोबर 25 रोजी मौजे उदयपूर व तेटपाडा या दोन गावचा लोक सहभागातून गाव मूल्यांकन प्रक्रिया PRA कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला,या दोन गावांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे मागील 3 महिन्यात या गावात आमूलाग्र बदल घडून आला आहे, यात स्वदेस फाउंडेशन यांच्या मार्गदर्शन खाली ही गावे नवीन भरारी घेत आहेत, उदयपूर व तेटपाडा या गावात एकूण 250 घरे आहेत, या घराना 100%एकच रंग दिला गेला, सर्व घरांचे 100% शोष खडे खोदून पूर्ण झाले आहे,गावात सुशोभीकरण व बोलक्या भीती बनवल्या आहेत, गावाला सुंदर अशी कमान बनवली आहे, विशेष गावाने पुढाकार घेऊन गावातील दारू बंद केली आहे. सदर सर्व कामे पूर्ण झाले, या मुळेच स्वदेस या गावात काम करण्यास सुरुवात करणार आहे. सदरील कार्यक्रमास वरिष्ठ व्यवस्थापक दिपक गीऱ्हे,नंदुरबार विभाग, संदेश बिरवाडकर कळवण विभाग, राजेंद्र गुंड व दिपक मोरे सुरगाणा विभाग व त्यांची टीम त्याच बरोबर मालघवान ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक साहेब, रमेश दादा थोरात, सचिन आहेर नगर अध्यक्ष, ललित चव्हाण NDCC बँक. तसेच विविध गावातील गाव विकास समिती पालविहिर गाव विकास समिती, भिंतघर, कोटंबी, करवंदे, डोलारे, या गाव विकास समिती व गावकरी उपस्थित होते.
माझा गाव माझा अभिमान, आमच्या स्वप्नातील गाव कार्यक्रमाचा शुभारंभ
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0