दिंडोरी l मनोज पाटील:- मे महिन्यापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.. विशेषता द्राक्ष उत्पादक आणि टोमॅटो तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक द्राक्ष बागा फेल गेल्या असून अनेक द्राक्ष बागेच्या गर्भधारणा झालेल्या नाही. अनेक ठिकाणी द्राक्ष घडांची कुज झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत आहे. आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी चिंचखेड येथील नुकसान झालेल्या क्षेत्रांची पाहणी केली. द्राक्ष बागेवर लाखो रुपयांचे भांडवल खर्च करून आज शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने फक्त तुटपुंजी मदत असल्याने यातून शेतकरी पूर्णतःउभा राहू शकत नाही. सरकारने दिलेली हेक्टरी मदतीइतके पैसे शेतकऱ्याला फक्त औषध फवारणीच्या डिझेल साठी लागतात.. त्यातच औषधांची झालेली दरवाढ वेगळीच.. त्यामुळे शेतकरी सरकारच्या मदतीतून सावरू शकत नाही. त्यामुळे आता हीच ती कर्जमाफी करण्याची वेळ आहे असे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव बघरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील, डॉक्टर योगेश गोसावी,युवा सेनेचे ओंकार पाटील, विजय पाटील, किरण संधान,गोरख जाधव,सुरज पाटील,रोशन मातेरे, आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची हीच वेळ-खासदार भगरे
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0