महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*कादवा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू* शेतकऱ्यांनी ऊस लागवड करा : नामदार नरहरी झिरवाळ

दिंडोरी l मनोज पाटील :- गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून द्राक्षबागा यंदा उभ्या राहिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
    कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते उसाची मोळी टाकून करण्यातबाला या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, खासदार भास्कर भगरे,मवीप्र चे सरचिटणीस नितीन ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक माजी संचालक गणपतरावं पाटील,बाजार समिती चेअरमन प्रशांत कड आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षस्थानी कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे होते.
     झिरवाळ म्हणाले, “सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात येत आहे. तथापि ऊस हे शाश्वत पिक आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून कादवा कारखान्याला ऊसपुरवठा करावा.”
मतदारसंघातील शेती समृद्ध व्हावी यासाठी वीज पाणी रस्ते यासाठी खास प्रयत्न करत असल्याचे सांगताना त्यांनी एकदरे प्रकल्पातून अतिरिक्त पाणी मिळणार असल्याची माहिती दिली. तसेच विविध नद्यांवर साठवण बंधारे उभारण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

“पावसाची उघडीप मिळताच रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.

आधुनिक तंत्रज्ञान वापरा – शेटे
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीराम शेटे यांनी कादवाच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले की, “उत्पादनवाढ ही आजची गरज असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व एआयचा वापर करून एकरी उत्पादन वाढवावे. प्रत्येक सभासदाने ऊस लागवड करावी असे आवाहन करत आगामी काळात कमी दिवसात जास्त गाळप करण्यासाठी विस्तारिकरन करणे आवश्यक असून त्यांदृष्टीने तयारी सुरु असून सी एन जी प्रकल्प ही सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार भास्कर भगरे, मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, कामगार युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
 यावेळी सदाशिव शेळके, संजय पडोळ, अशोक वाघ, विश्वासराव देशमुख, अनिल देशमुख,कैलास मवाळ, गंगाधर निखाडे,व्हा. चेअरमन शिवाजी बस्ते तसेच कारखान्याचे संचालक सभासद शेतकरी कामगार उपस्थित होते.स्वागत संचालक रावासाहेब पाटील यांनी केले. आभार संचालक सुखदेव जाधव यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.
---
यांचे हस्ते झाली गव्हाण पूजा 

सौ. व श्री. विक्रांत पाटील 
सौ. व श्री. प्रशांत जमधडे
सौ. व श्री. प्रकाश चौधरी
सौ. व श्री. भरत काशिद 
सौ. व श्री. विजय पाटील 
सौ. व श्री. बाबुराव सोनवणे 
सौ. व श्री. अरुण देशमुख
सौ. व श्री. श्रीराम आहेर
सौ. व श्री. आत्माराम पाटील 
सौ. व श्री. रमेश शिंदे 
सौ. व श्री. राजेंद्र चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने