बोरगाव l प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा (उत्तर) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यतिन रावसाहेब कदम जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन कार्यकारिणीत सुरगाणा तालुक्याच्या कल्पना चंद्रकांत भरसट यांची जिल्हा सरचिटणीस (महामंत्री) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्पना भरसट यांच्या नियुक्तीबद्दल सुरगाणा तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला असून, भारतीय जनता पार्टी सुरगाणा तालुक्याच्यावतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
या नियुक्तीद्वारे सुरगाणा तालुक्याला पक्ष संघटनेत नवे बळ मिळाले असल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.