महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सोमवारी माजी आमदार रामदास चारोस्करांचा भाजपात प्रवेश सोहळा

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामदास चारोस्कर व सुनीता चारोस्कर व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी भव्य पक्ष प्रवेश व कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा सोमवार, दिं. 3 नोव्हेंब रोजी सकाळी 11.00 वाजता, संस्कृती लॉन्स, नवीन मार्केट यार्ड शेजारी, दिंडोरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
      भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार रामदास चारोस्कर आणि जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सोबत दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती, संचालक, आजी - माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच दिंडोरी-पेठ विधानसभा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. दिंडोरी शहरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रथम येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. दिंडोरी येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांशी संवाद सुध्दा केला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने