महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बाऱ्हे - ठाणगाव रस्त्यावर फरशी पुलावर भगदाड, धोकादायक वाहतूक.

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- बाऱ्हे - ठाणगाव रस्ता हा सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेकडील ४० ते ५० गाव - पाड्यांना तसेच गुजरात राज्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. नेहमी वाहतूक असलेल्या या मार्गावर गोपाळपूर फाट्या जवळील फरशी पुलावर १० ते १५ फूट मोठा खोल मोठे भगदाड पडल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. बाऱ्हे विभाग हा अनेक खो-यांमध्ये विभागला आहे. विभागातील मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण म्हणून बाऱ्हे बाजारपेठेची ओळख आहे. पोलीस ठाणे, वन विभागाचे कार्यालय, शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय व इतर शासकीय कामकाजासाठी याठिकाणी विभागातील अनेक गावांतील ग्रामस्थांचा राबता असतो. खिर्डी, खोकरविहीर, आंबोडे, राक्षसभुवन खोऱ्यातील गावे तसेच गुजरात राज्यातील पंगारबारी, खडकी येथील लोकांना बाजारपेठेत येण्यासाठी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बाऱ्हे - ठाणगाव मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे संपूर्ण फरशी पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने