महाराष्ट्र ट्रायबल न्युज

करंजवण येथे वोक्हार्ट फाउंडेशन पी एच सी अवनखेड तर्फे मंगळवारी मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन

दिंडोरी l प्रतिनिधी:-वोक्हार्ट फाउंडेशन, परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन, ग्रामपंचायत करंजवण तसेच वोक्हार्ट पीएचसी अवनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ग्रामपंचायत सभागृह, करंजवण (ग्रामपंचायत कार्यालय शेजारी) येथे होणार आहे.
      या शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांमार्फत नागरिकांची सामान्य आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, दंतरोग तपासणी तसेच रक्त, लघवी आणि इतर तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येतील.
    वोक्हार्ट फाउंडेशन तर्फे सर्व प्रकारच्या औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार असून, रक्त व लघवी तपासण्या, नंबरचे चष्मे, सॅनिटरी पॅड तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
     हे शिबिर ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8390113509

🌸 संजीवनी आरोग्य – निरंतर आपल्या सेवेत 🌸

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने