महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जि.प. शाळा तोरणडोंगरी येथे जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

अलंगुण l प्रतिनिधी:- सुरगाणा तालुक्यातील जि.प. शाळा तोरणडोंगरी येथे (आज दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजाती गौरव दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिगंबर चौधरी होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात बिरसा मुंडा यांचे बालपण, त्यांचे कार्य याविषयी माहिती दिली. तर शाळेतील शिक्षक श्री रमेश गावित, श्री जहिराम महाले व श्री युवराज पवार यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्री. चौधरी सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बिरसा मुंडा यांच्या 'उलगुलान' विषयी माहिती दिली. गायवन सरानी सूत्रसंचालन तर भोये सरांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने