दिंडोरी l प्रतिनिधी:- क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था नाशिक संचलित माध्यमिक विद्यामंदिर ढकांबे येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू चा जीवनपट आपल्या मनोगतातून सांगितला पंडित नेहरू यांना लहान मुले खूप प्रिय होती आपणही असे म्हणू शकतो लहानपणीचा काळ जणू आनंदाचा खजिनाच होता असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक अनिल ताडगे सर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या उपशिक्षक रघुनाथ उगले व काकड मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी सांगळे सर, गायकवाड मॅडम ,सरला आव्हाड मॅडम, अशोक गीते व सर्व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी रूपाली धात्रक व अक्षदा धात्रक यांनी केले.