पालघर l सौरभ कामडी:-आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान, क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त युवा आदिवासी संघ, जव्हार यांच्या वतीने आदिवासी क्रांती चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमास आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती लाभली.
यावेळी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून जय जोहार, उलगुलान जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद अशा घोषणा देत क्रांतिकारकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
गोरगरीब मायबाप जनतेला आपल्या हक्कची जमीन व अधिकार मिळवून देणारे महान क्रांतिकारक तसेच जुलमी सहकारशाही व भांडवलशाहीच्या विरोधात इंग्रजाना सलो की पळो करून सोडणारे व भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभ्या राहिलेल्या या योद्ध्याच्या कार्याचे स्मरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमास युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष संदीप माळी, माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा, माजी कार्याध्यक्ष विनूदादा मौळे, उपाध्यक्ष सुनील जाबर, माजी अध्यक्ष महेश भोये, महिला अध्यक्ष सुवर्णा रावते, सामाजिक कार्यकर्त्या हेमा राऊत, रंजना बुधर, निर्मला घाटाळ, माजी उपाध्यक्ष राहुला घेगड, बाळकृष्ण भोये, सामाजिक कार्यकर्ते चेतन कव्हा, मनोज अवतार, सोशल मीडिया प्रमुख गौरव गवळी, काशिनाथ भोये, अमोल मोकाशी, आदेश थेतले, सौरभ खुताडे, अमित जंगली, राजेश भोरे, राजेश कडू, दिलीप भोये, उपसरपंच सुभाष भोरे, आमीत डोके, रुपेश भोरे, विशाल घेगड, राहुल शेंडे, कुणाल सापटा, तरण पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच गावोगावच्या ग्रामपंचायतींचे सरपंच आपटाळे सरपंच कैलास पागी, साकूर सरपंच सुनील वळवी, देहरा माजी उपसरपंच नानू गवळी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. पत्रकार प्रमोद मौळे, तसेच विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते आणि जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वक्त्यांनी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध उभारलेल्या उलगुलान चळवळीची आठवण करून देत "आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या महान योद्ध्याचे विचार आजही आम्हाला मार्गदर्शक आहेत" असे सांगितले.
अखेरीस जय जोहारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आदिवासी समाजाच्या ऐक्याचा आणि परंपरेचा भव्य जल्लोष या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.