महाराष्ट्र ट्रायबल न्युज

गुटखा विक्रेते, उत्पादकांवर 'मकोका'


दिंडोरी। प्रतिनिधी :- गुटखाबंदी असतानाही परराज्यातून वेणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी गुटखा उत्पादक आणि या व्यवसायातील सूत्रधारांबर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्याचे संकेत राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
      राज्यात गुट्खा व पान मसाला जन्य पदार्थांची वाहतूक व विक्री होत आहे. त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री
     नरहरी झिरवाळ यांनी दिली. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची कड़क अंमलबजावणी होईल, त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना 'मकोका' लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. गुटखाबंदी विरोधात
      जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात बाबी, अशा सूचनाही ना. झिरवाळ यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे कृत्रिमरित्या फळे व भाज्या पिकविण्यासाठी व नियमबाह्य पद्धतींचा वापर रोखण्यासाठी तपासणी अधिक कडक करण्यात यावी तसेच अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही ना. नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

हॉटेल तपासणी सुरु करणार
    राज्यात १५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत 'संकल्प हॉटेल स्वच्छतेचा' या उपक्रमांतर्गत हॉटेलची तपासणी करण्यात येणार आहे. यात प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील २० मोठी हॉटेले तपासतील तर सहायक आयुक्त १० हॉटेल्सची तपासणी करतील आणि आयुक्त ५ हॉटेल्सची तपासणी करतील, असे निर्देश देण्यात आले आहेत. यात त्रुटी आढळून आल्यास हॉटेलला तात्काळ सुधारणा नोटीस, कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. नोटीसीचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांनंतर फेरतपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश यावेळी ना. नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने