अलंगुण l कृष्णा पवार:- जिल्हा प्राथमिक शाळा आंबाठा येथे समाजसुधारक, शिक्षणप्रणेत्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. बंगाल सर यांच्यासह शिक्षकवर्गातील गावंडे सर, झिरवाळ सर, चौधरी सर, वाघेरे सर, भोये सर, भुसारे सर, जाधव मॅडम, धुम सर, वाघमारे सर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित भाषण, गीत, अभंग सादर करून समाजातील शिक्षण, स्त्रीशिक्षण आणि समानता याबाबतचे त्यांचे योगदान अधोरेखित केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.