महाराष्ट्र ट्रायबल न्युज

गोकुळ झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरीत न समजलेले आई -वडील याविषयावर प्रसिध्द व्याख्याते वसंत हंकारे (सांगली) यांचे व्याख्यान उत्साहात

दिंडोरी । प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी जनता विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या न समजलेले आई -वडील याविषयावर प्रसिध्द व्याख्याते वसंत हंकारे (सांगली) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
   प्रसिध्द व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्याख्यानात सांगितले की, नऊ महिने नऊ दिवस पोटात सांभाळून आई जन्माला बाळ घालते. या काळात तिच्या वेदना प्रचंड असतात. जीवन मरणाचा प्रश्‍न असतो. वडील सुध्दा पुर्ण ताकदीने आपल्या मुलांना वाढवितात. दोघेही प्रसंगी अडचणी सहन करतात. परंतू मुलांना काही कमी पडू देत नाही. आपल्या आई-वडीलांच्या त्यागाची जाणीव ठेवून कष्टाची जाण ठेवावे व आई-वडीलांचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते वसंत हंकारे (सांगली) यांनी केले. व्याख्यानाच्या सुरवातीला गोकुळ झिरवाळ यांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला. वसंत हंकारे व गोकूळ झिरवाळ यांचा मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यात सांगितले की, महाराष्ट्र ही शुरवीरांची भुमि आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. ते पुढे टिकवण्याचे काम आपला प्राण जाई पर्यंत छत्रपती संभाजी राजेंनी केले. संभाजी राजेंना वडील शिवाजी समजले त्यानंतर त्यांनी स्वराज्यसाठी बलदान केले. सावित्रीबाई फुलेंना शाळा शिकवण्यासाठी जातांना पुण्याच्या रस्त्यावरुन लोकांनी दगड मारले, शेण फेकले पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि मुलींना सुसंस्कृत केले. त्यामुळेच आज हजारो सावित्री घडू शकल्या व शारकता पसरली. जिजाऊ, फुले, आंबेडकर, बुद्ध, लक्ष्मीबाई या आपल्या चरित्राचे आदर्श आहे. असे असतांना आज तीन वर्षांच्या मुलीवर नराधम अत्याचार करीत आहे. गुटखा, दारु यांच्या व्यसनात युवक पिढी नामद होत चालली आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात युवक फसवत आहे व त्यांचे दगडाने ठेचून खुन करीत आहे. मोबाईलच्या वापरामुळे मुली सुध्दा बहकत आहे. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने प्रबोधनाची गरज आहे. मुलींनी आई - वडीलांची मान पोलिस ठाण्यात झुकू देवू नये, आई-वडीलांची शपथ घेवून त्यांच्यासाठी कष्ट करा, मोठे व्हा, असा सल्ला वसंत हंकारे यांनी दिला.
    यावेळी गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरी - पेठ मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने