महाराष्ट्र ट्रायबल न्युज

भेगू सावरपाडा विद्यार्थ्यांची क्रिडा स्पर्धेत तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी

अलंगुण l प्रतिनिधी:- आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुन संचलित,अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भेगु सावरपाडा शाळेच्या विद्यार्थ्यांची आदिवासी विकास विभाग अंतर्गत घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली.
   यामध्ये झालेल्या खो-खो स्पर्धेमध्ये 14 वर्ष व 19 वर्ष वयोगटामध्ये मुलींनी बाजी मारून प्रथम क्रमांक मिळवून प्रकल्प स्तरावर झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे 4/100 रिले 4/400 रिले, धावणे, लांब उडी, अशा विविध खेळांमध्ये एकूण 54 विद्यार्थ्यांनी यश मिळवून पुढे वाटचाल केली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय जे पी गावित साहेब व सर्व संचालक यांनी विद्यार्थ्यांच्या व क्रीडा शिक्षकांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे, आणि पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने