निळवंडी । प्रतिनिधी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली नसली तरी इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर थंडी वाढत असल्याने गावोगावी शेकोट्यांभोवती निवडणुकीच्या पेटलेल्या गप्पांचा फड शेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
सध्या वातावरणात गारवा पसरत असल्याने पहाटे व रात्री थंडीने हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावागावांत शेकोट्या दिसून येत असून निवडणुकीच्या गप्पांच्या फड रंगत आहे. थंडी वाकुयाने उबदार कपडे वापरण्याकडे कल वाढला आहे, तर काहींनी अडगळीतील जुने स्वेटर, मफलर, कानटोपी आणि इतर उबदार कपडे बाहेर काढले आहेत. थंडीचा जोर वाढल्यामुळे
ग्रामीण भागात ब्लॅकेट, सोलापुरी चादरी, रजई व शाल यांसारखे उबदार साहित्य विक्रीसाठी राजस्थान, गुजरात व इतर राज्यातून विक्रेते येत आहेत.
कडाक्याच्या थंडीत शेकोटीची ऊब घेत मित्रांच्या आपल्या उमेदवाराचे राजकीय समीकरण व त्याच्या विश्लेषणाचे मुद्दे गप्पांमध्ये रंगताना दिसत आहेत. थंडीचा ऋतू आरोग्यासाठी लाभदायी मानला जातो. हिवाळ्यामध्ये शरीराच्या अप्रीला नैसर्गिक शक्ती मिळत असते. त्यामुळे हिवाळ्यात भूक चांगली लागते व त्यासोबत पचनक्रियादेखील सुधारते. यामुळे हा ऋतू आरोग्यदायी मानला जातो. आहारासोबत व्यायामावरदेखील नागरिक भर देतात.
यामुळे सकाळ- संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्याऱ्यांची संख्याही वाढत असून फेरफटका मारताना उमेदवारांच्या प्रभावाची चर्चा रंगताना दिसत आहे.