maharashtratribalnews

नाशिक पेठ रस्त्यावर अपघातात एक ठार


दिंडोरी l प्रतिनिधी 
गुजरात राज्याला जोडणारा नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर असलेला चाचडगाव नजीक गंगासागर धाबा जवळ नाशिक कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने गंगासागर धाब्याजवळ मोटरसायकल चालकास धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमीस तातडीने श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज विनामूल्य रुग्णवाहिकेने नाशिक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले 
मिळालेली माहिती अशी की नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील गंगासागर डाव्या जवळील कॉर्नरला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल क्रमांक एम एच 15 के ए 37 89 या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल वरील राहुल दिनू बागुल वय अंदाजे 24 हा जागेच ठार झाला तर चांगदेव अमृता गायकवाड यांना गंभीर जखमी अवस्थेत श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज विनामूल्य रुग्णवाहिकेने नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने