बाऱ्हे l नामदेव पाडवी
विरमाळ येथे स्वदेश फाऊंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र आंबे अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पाहूचीबारी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत कोठावदे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. चंचल कौर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर संपन्न झाले.
या आरोग्य शिबीरामध्ये नेत्र, रक्तदाब, रक्तातील साखर, हृदय तपासणी, रक्त आदीसह १४० रूग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. यावेळी समन्वयक दिगंबर वाडेकर, आरोग्य सेवक विलास जाधव, आरोग्य सेविका कलावती जाधव, आशा कार्यकर्ती चंद्रभागा जाधव, कला चौधरी, पुष्पा भोये, एस.एम.बि.टी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सार्थक गाव विकास समिती, विरमाळ गावातील तरुण व महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
Tags
आरोग्य