महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ग्रामपंचायत बाडगीचापाडा, तळ्याचापाडा, शिवपाडा गावच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न .

माळेगाव l धर्मराज चौधरी :- ग्रामपंचायत बाडगीचापाडा, तळ्याचापाडा व शिवपाडा गावाच्या वतीन 9 ऑगस्ट जागतीक आदिवासी दिन कार्यकमा निमित्त उपस्थित गावचे सरपंच सुदाम पवार, उप सरपंच रुघुनाथ गावित, ग्रामसेविका गायकवाड मॅडम,माजी सरपंच सोमनाथ हिंडे, पोलीस पाटिल शंकर  तुंगार पाटिल, कृष्णा गोपाळा हिंडे, नारायण गावित, रघुनाथ पवार,सोमनाथ चौधरी, छगन गवळी अखिल भारतीय आदिवासी सेना सचिव, नरेंद्र गायकवाड, बाळु पवार, कृष्णा गावित,नामदेव गावित, कैलास राऊत, दत्तात्रय चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, चंद्रबाई पवार,हिराबाई देशमुख, मनोहर महाले मंजुळा हिंडे, इंदुबाई शिंदे, मंगलबाई भरसट, देवका गायकवाड, महिला बचत गट, लिलाबाई सोमनाथ हिंडे, लिलाबाई हिंडे दीक्षा हिंडे, कृषीबाई शिखरे, मंगलबाई शिखरे,जिजाबाई देशभुख, भारतीबाई पवार, पार्वताबाई  हिंडे,मिनाबाई पवार, जाजा वाघ, मंजुळा  चव्हाण, पार्वताबाई जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग सर्व महिला बचत व अनेक ग्रामस्थ व महिला बाल गोपाळ तरुण मित्र मंडळ बाडगीचापाडा  9 ऑगस्ट जागदिना निमित्त गावात समाज जन जागृती रॅली  आदिवासी वाद्य  पावरी व सांबळ घोषणा  यांच्या गर्जना तालात पारंपारिक  पद्धतीने आदिवासी  या कार्यक्रमात आदिवासी चालीरीती  रूढी परंपरा पारंपारिक समाज संस्कृतीचे दर्शन जागतिक एकता समानता बंधुता निसर्ग पूजक निसर्गाचे महत्व आद्य क्रांतिकारक यांचे कार्य  आणि शौर्ययांची महंती दर्श विण्याकरिता आयोजन करण्यात आले होते. संस्कृती,क्रांतिकारक प्रतिमेची पुजा व भाषणे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठा आनंद उत्सव  9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन बाडगीचापाडा येथे साजरा केला व नरेंद्र दौलत गायकवाड  यांच्याकडून  जिल्हा परिषद शाळा  बाडगीचापाडा येथील 64 विद्यार्थी यांना शालेय वस्तू वही,अल्कंपी,पेन्सिल, खोडलबर, शॉपनर अशा वस्तू  भेट दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने